Career Opportunities in Central Government Departments After 10th
निम-लष्करी दलात कॉन्स्टेबल-
परिक्षेतुन कोणती पदे भरली जातात-
- सीमा सुरक्षा दल (बीएसएफ),
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ),
- केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ),
- इंडो तिबेट सीमा पोलीस कॉन्स्टेबल (आयटीबीपी)
- सशस्त्र सीमा बल (एसएसबी),
- राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए)
- आसाम रायफल्स अशा विविध निम लष्करी दलात भरती केली जाते
शैक्षणिक पात्रता-
मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी पास.
वय मर्यादा: 18-23 वर्षे
परीक्षा पद्धती
एसएससी जीडी कांस्टेबल परीक्षा आधारित संगणक आधारित परीक्षा (सीबीई), शारीरिक मानक परीक्षा (पीएसटी), शारीरिक कार्यक्षमता परीक्षा (पीईटी), आणि विस्तृत वैद्यकीय परीक्षा / तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (डीएमई) समाविष्ट इ. टप्प्यातून सामोरे जावे लागते.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षेत तुम्हाला ऑब्जेक्टिव मल्टीपल चॉईस टाइप प्रश्न विचारले जातील, जी संगणक आधारित परीक्षा आहे.
परीक्षेसाठी विषय
प्रश्नपत्रिका चार भागात विभागली गेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातील. वेळ 90 मी. असतो
- सामान्य बुद्धिमत्ता आणि रीझनिंग
- सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता
- प्राथमिक गणित
- हिंदी / इंग्रजी
आपणास प्रत्येक विषयातून 25 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नात आपल्याला चार पर्याय दिले जातील त्यातील फक्त एक पर्याय योग्य असेल.परीक्षेतील प्रत्येक योग्य उत्तरासाठी तुम्हाला 1 गुण देण्यात येईल.
कट ऑफ गुण
- SSC ने जीबीई कॉन्स्टेबलची सीबीई (संगणक आधारित परीक्षा) उत्तीर्ण होण्यासाठी कट ऑफ गुण निश्चित केले आहेत.
- जर आपण सामान्य / माजी सैनिक असाल तर आपल्याला ही परीक्षा पास होण्यासाठी कमीतकमी 35% गुण मिळवावे लागतील.त्याचबरोबर ओबीसी / एससी / एसटी विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी% 33% गुण आणावे लागतील.
ही संगणक आधारित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याकडे शारिरीक चाचणी व वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल, त्यानंतर तुम्हाला एसएससीकडून भारतीय अर्धसैनिक दलातील जीडी कॉन्स्टेबल पदासाठी नियुक्त केले जाईल.
भारतीय डाक विभागात GDS-
कोणत्या पदासाठी भरती होते-
BPM हा ब्रँच पोस्ट ऑफिस चा इंचार्ज असतो तर ABPM/GDS हे त्यांना सहाय्य करण्यासाठी असतात. BPM saving, RD सुकन्या या खात्यात पैसे भरणे काढणे हे मुख्य काम त्यांचे असते तर ABPM टपाल वाटण्याचे काम करतात
BPM/ABPM साठी वेतन-
ग्रामीण डाक सेवकांचे वेतन कामाच्या तासानुसार निश्चित केली जाते.
- BPM - 4 तासासाठी किमान टीआरसीए - ₹ 12000. 5 तासासाठी किमान टीआरसीए - ₹ 14500
- ABPM - 4 तासासाठी किमान टीआरसीए - ₹ 10000 5 तासासाठी किमान टीआरसीए - ₹ 12000
शैक्षणिक पात्रता व वय-
- गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून शिकलेले) घेऊन १० वी ( माध्यमिक शाळा परीक्षा ) उत्तीर्ण असावे लागते
- उमेदवाराने किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून) अभ्यास केलेला पाहिजे.
- जीडीएस पदांसाठी किमान आणि कमाल वय अनुक्रमे 18 आणि 40 वर्षे असेल
या पदांसाठी परीक्षा असते काय-
या पदासाठी कुठलीही परीक्षा होत नाही इयत्ता 10 वी च्या टक्केवारी नुसार भरती होते.खुल्या प्रवर्गासाठी जवपास 90 +% ची आवश्यकता असते.
रेल्वे विभागात ग्रुप डी-
- संगणक आधारित ऑनलाईन टेस्ट
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- १० वी ( माध्यमिक शाळा परीक्षा ) किंवा ITI उत्तीर्ण असावे लागते
- जीडीएस पदांसाठी किमान आणि कमाल वय अनुक्रमे 18 आणि 33 वर्षे असेल
- सामान्य विज्ञान - 25 प्रश्न
- गणित - 25 प्रश्न
- सामान्य बुद्धिमत्ता आणि रीझनिंग - 30 प्रश्न
- सामान्य जागरूकता आणि करंट घडामोडी - 20 प्रश्न
- संगणक आधारित ऑनलाईन टेस्टमध्ये पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते
- पुरुषांसाठी 2 मिनिटात 35 किलो वजन घेऊन 100 मिटर अंतर पार करावे लागते त्याचप्रमाणे 1000 मिटर अंतर 4 मी 15 सेकंदात पूर्ण करावे लागते
- तर महिलांसाठी 2 मिनिटात 10 किलो वजन घेऊन 100 मिटर अंतर पार करावे लागते त्याचप्रमाणे 1000 मिटर अंतर 4 मी 15 सेकंदात पूर्ण करावे लागते
- यानंतर वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पढताळणी होते आणि अंतिम निवड केली जाते
निष्कर्ष: Conclusion
निम-लष्करी दल, भारतीय डाक विभाग, आणि रेल्वे विभागात भरतीसाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत. या पदांसाठी योग्य पात्रता आणि तयारी आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक तयारीसह या परीक्षांना सामोरे जाऊन सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळते.