Postman , Mail Gaurd , MTS बद्दल सविस्तर माहिती

  


Postman , Mail Gaurd , MTS यांची कामे-

   Postman आणि Mail Gaurd चा पगार पहिला तर सारखाच असतो पण फरक असतो तो त्याच्या कामात. पोस्टमन हा पोस्ट ऑफिसशी जोडलेला असतो तर Mail Gaurd हा RMS शी जोडलेला असतो. RMS म्हणजे Railway Mail Services होय.      पोस्टमनला पत्र वाटणे एवढेच काम नसून टपाल वाटणे, पार्सल वाटणे, मणी ऑर्डर वाटणे तसेच सध्या त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेचेही काम करावे लागते ते म्हणजे IPPB च्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे भरणे, ते काढून देणे, पैसे ट्रान्सफर करणे इत्यादी कामे करावी लागतात. Postman हे Sub Post office किंवा Head Post Office शी जोडलेले असतात . ते ग्रामीण भागात हि कामे करत नाहीत हि कामे ग्रामीण भागात काम करण्यासाठी GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक असतात. 

      MailGuard हे रेल्वे टपाल व्यवस्थेशी जोडले गेलेले असतात.  रेल्वेद्वारे आलेले टपाल शॉर्टींग करणे , बॅगा शॉर्ट करणे त्या पोस्ट ऑफिस पर्यंत आणि पोस्ट ऑफिसचे टपाल रेल्वेद्वारे पाठवणे हे त्यांचे मुख्य काम असते.

     MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ होय. नावाप्रमाणेच त्यांना अनेक कामे करावी लागतात. ऑफिसमधील सांगितलेली कामे त्यांना करावी लागतात. तसे पाहिले तर हे पद ग्रुप D चे पद आहे . फाईल आणणे ते पोहचवणे तसेच इतर छोटी मोठी कामे करावी लागतात


Postman , Mail Gaurd , MTS यांना पगार- 

    7 व्या वेतन आयोगानुसार Postman आणि Mail Gaurd यांचा पगार हा Pay Level 3 नुसार  ₹ 21700 ते 69100  असा आहे . म्हणजे जुना  (₹ 5200 - 20200 + ग्रेड पे 2000 ) आहे. जवळपास महाराष्ट्र शासनाच्या पोलीस कॉन्टेबल इतका पगार मिळतो. 

एकूण पगार - 
  • (मुंबई/पुणे) - जवळपास ₹ 35821/-
  • (अमरावती/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/भिवंडी/सोलापूर/कोल्हापूर/वसई-विरार/मालेगाव/नांदेड/सांगली) - जवळपास ₹ 31907/-
  • इतर ठिकाणी - जवळपास ₹ 30171/-

        MTS चा पगार हा Pay Level 1 नुसार  ₹ 18000 ते 56900  असा आहे . म्हणजे जुना  (₹ 5200 - 20200 + ग्रेड पे 1800 ) आहे. जवळपास महाराष्ट्र शासनाच्या शिपाई इतका पगार 
मिळतो. मात्र वरील सर्व पदे हि केंद्र शासनाची आहेत.

एकूण पगार - 
  • (मुंबई/पुणे) - जवळपास ₹ 30456/-
  • (अमरावती/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/भिवंडी/सोलापूर/कोल्हापूर/वसई-विरार/मालेगाव/नांदेड/सांगली) - जवळपास ₹ 26838/-
  • इतर ठिकाणी - जवळपास ₹ 25398/-

Postman , Mail Gaurd , MTS पदासाठी पात्रता-

Postman आणि Mail Gaurd पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावे लागते आणि महाराष्ट्रासाठी मराठी तर गोव्यासाठी मराठी/कोकणी भाषेचे ज्ञान असावे लागते . इ 10 वी पर्यंत महाराष्ट्रासाठी मराठी तर गोव्यासाठी मराठी/कोकणी विषय असावा लागतो.तसेच संगणकाचे ज्ञानही असावे लागते.
   MTS पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण असावे लागते आणि महाराष्ट्रासाठी मराठी तर गोव्यासाठी मराठी/कोकणी भाषेचे ज्ञान असावे लागते . इ 10 वी पर्यंत महाराष्ट्रासाठी मराठी तर गोव्यासाठी मराठी/कोकणी विषय असावा लागतो.तसेच संगणकाचे ज्ञानही असावे लागते.

Postman , Mail Gaurd , MTS पदासाठी वयोमर्यादा

वरील सर्व पदे ही केंद्रसरकारची असल्याने Postman आणि Mail Gaurd पदासाठी 18 ते 27 तर MTS पदासाठी 18 ते 25 दरम्यान वय असावे . इतर कास्टसाठी नियमानुसार सूट आहे.

Postman , Mail Gaurd , MTS निवड-

➤पेपर 1 (वेळ 90 मिनिट) - 100 प्रश्न 100 गुण
  • सामान्य ज्ञान  (खालील प्रत्येक विषयावरील 4 ते 8 प्रश्न) - 30 प्रश्न 30 गुण)
 अ) भारतीय भूगोल
 ब) नागरी
 क) सामान्य ज्ञान
 ड) भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्य
 ई) नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास

  • मूलभूत अंकगणित(खालील प्रत्येक टॉपिकवर  4 ते 8 प्रश्न) - 40 प्रश्न 40 गुण)
 A) बॉडमास (कंस, ऑर्डर, विभागणी, गुणाकार,वजाबाकी)
B) टक्केवारी
C) नफा आणि तोटा
D) साधे व्याज चक्रवाढ व्याज
E) सरासरी
F) वेळ आणि कार्य
G) वेळ आणि अंतर
H) एकांगी पद्धत

  • तर्क व विश्लेषणात्मक क्षमता ( बुद्धिमत्ता)- 30 प्रश्न 30 गुण
व्हर्बल व नॉन -व्हर्बल

➤पेपर 2 - वेळ -45 मिनिटे, गुण - 60
  • इंग्रजीमधून स्थानिक भाषेत शब्दांचे भाषांतर (मल्टीपल चॉईस प्रश्न) 15 प्रश्न 15 गुण
  • स्थानिक भाषेतून इंग्रजीमध्ये शब्दांचे भाषांतर (मल्टीपल चॉईस प्रश्न) 15 प्रश्न 15 गुण
  • 80 ते 100 शब्दांमध्ये स्थानिक भाषेत पत्र लिहिणे (3 पर्यायांपैकी 1 प्रश्न सोंडवणे) - 15 गुण
  • स्थानिक भाषेमध्ये 80 ते 100 शब्दात परिच्छेद / लहान निबंध(3 पर्यायांपैकी 1 प्रश्न सोंडवणे) - 15 गुण

➤पेपर 3 वेळ - 20 मिनिट गुण - 40
  • संगणकावर 20 मिनिटांकरिता डेटा एंट्रीची कौशल्य चाचणी


पेपर 1 हा 100 गुणांचा असून निवड हीं पहिल्याच पेपर वर आहे इतर 2 पेपर फक्त पात्र व्हायचे असते.


Postman , Mail Gaurd , MTS यांची पदोन्नती किंवा बढतीच्या संधी-

Postman आणि Mail Gaurd , MTS यांना Postal Assistant (ग्रेड पे 2400) , Inspector of Post (ग्रेड पे 4600), Assistant Supretendent of Post office (ग्रेड पे 4800), Supretendent of Post office (ग्रेड पे 5200) पर्यंत बढतीस संधी आहेत

निष्कर्ष (Conclusion)

पोस्टमन, मेल गार्ड, आणि MTS या पदांवर काम करणाऱ्यांना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. या पदांसाठी योग्य पात्रता आणि कौशल्य आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या या पदांवर काम करून भविष्य उज्ज्वल होण्याची संधी आहे.

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel